राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० पर्यंत अर्ज करा

क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे आवाहन

⚡ओरोस ता.१४-: शासना मार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार १९ / २० ते २१ /२२या तीन वर्षाच्या पुरस्कारासाठी १६ ते ३० जानेवारी या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक क्रीडा पटू खेळाडूंनी विहित नमुन्यात विहित मुदतीत जिल्हा क्रीडा कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे .

“शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाच्या प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ,उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, [खेळाडू ]शिवछत्रपती राज्यसहसी क्रीडा पुरस्कार ,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, [दिव्यांग खेळाडू ] असे पुरस्कार प्रदान करते, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार साठी नियमावली विहित केली आहे या नियमावलीनुसार २०१९ / २०, २० -२१ व २ ० / २ १ या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ खेळाडू पटू, क्रीडा मार्गदर्शक खेळाडू, दिव्यांग खेळाडू ,यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत अर्जाचे नमुने https: sports . maharashtra gov या संकेतस्थळास भेट देऊन डाऊनलोड करून घेऊन व्यवस्थित रित्या भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत १६ ते २० जानेवारी २३ पर्यंत ठेवण्यात आली आहे . अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या वरील संकेतस्थळावर पहावे पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक खेळाडू ‘दिव्यांग खेळाडू यांनी विहित नमुदतीत अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे .

You cannot copy content of this page