वेंगुर्ला
वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी जाणाऱ्या मार्गावर मठ मठकरवाडी नजीक ‘वेंगुर्ला ते पुणे’ जाणारी एसटी बस अन्य वाहनाने हुल दिल्याने गटारात कलंडली आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकास किरकोळ दुखापत झाली आहे.यात एस. टी. बसचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी मठ गावातील ग्रामस्थांनी तातडीने दाखल होत मदतकार्यास सहभाग घेतला. दरम्यान याच मार्गावर मागील कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाडी कटिंग करण्यात आली आहे. परंतु धोकादायक वळणावरील अनावश्यक झाडी तसेच साईडपट्टीवरील वाढलेले गवत याबाबत संबंधित संबंधित ठेकेदार याच्यामार्फत योग्य प्रकारे काम न झाल्याने अशाच प्रकारे दुर्दैवी घटना घडत आहेत. तसेच मठ मठकरवाडी एरियात केलेल्या कामावरनंतर माती व चिखलमय परिस्थिती असल्याने धोकादायक स्थिती आहे. याकडे तातडीने लक्ष पुरविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
मठ येथे एसटी बस गटारात कलंडली ; प्रवासी सुखरूप
