भाजपा, बाळासाहेबांची शिवसेनेमुळे चराठा ग्राम पंचायत निवडणुकीत रंगत
महेश पांचाळ कींगमेकर ठरणार का ? उत्सुकता शिगेला ⚡सावंतवाडी ता.१४-: चराठा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार रंगत आणली असून पक्ष निरीक्षक महेश पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. या पॅनलचे पारडे सध्यातरी जड दिसत असून महेश पांचाळ किंगमेकर ठरणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
