सावंतवाडीत भव्य क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ…

परशुराम चलवाडी यांच्या उपस्थितीत सोनाप्पा लाखे यांनी वाढविले श्रीफळ;रासाई युवा कला क्रीडा मंडळ, अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी समाज यांचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१५-: रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी समाजांच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर भव्य दिव्य असा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त उद्योजक परशुराम चलवाडी यांच्या उपस्थितीत श्री सोनाप्पा लाखे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून थाटात करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक नासिर शेख,मंडळाचे अध्यक्ष दीपक लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे,श्याम लाखे, बाबू सावंत, आदी उपस्थित होते.

दरम्यान या स्पर्धेला एकूण दहा संघानी सहभाग घेतला असून कोल्हापूर ,बेळगाव,गडहिंग्लज,
आदी भागातील संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघास २० हजार रुपये पहीले पारितोषिक तर दुसरे पारितोषिक हे 15 हजार आहे. दरवर्षी येथील जिमखाना मैदानावर या स्पर्धेचे नीटनेटके आयोजन केले जाते. एक आगळी वेगळी स्पर्धा म्हणूनही या स्पर्धेकडे पाहीले जाते.

You cannot copy content of this page