Headlines

सांगूळवाडीचे ग्रामदैवत श्री देवी भगवतीचा त्रिवार्षिक गोंधळ १७ जानेवारीला

वैभववाडी प्रतिनिधीसांगुळवाडी गावचे ग्रामदैवत श्री देवी भगवतीचा त्रिवार्षिक गोंधळ मंगळवारी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी श्री भगवती देवी मंदिर सांगुळवाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या त्रिवार्षिक गोंधळाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सांगळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

कुडाळ येथे
वॉकेथॉन रॅली संपन्न,

शेकडो नागरिकांचा सहभाग ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत ६ किलोमीटर वॉकेथॉनचे रॅलीचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रोटरी क्लब कुडाळ, लायन्स क्लब कुडाळ व गिअर अपजिम कुडाळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या वॉकेथॉनच रॅलीचा शुभारंभ आरएसएन हॉटेल चौकातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्याहस्ते फित कापून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात…

Read More

कणकवली येथील पटकीदेवी मातेचा १७ जानेवारीला जत्रोत्सव

⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील जागृत देवस्थान असलेल्या पटकीदेवी जरीमरी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १७ जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळच्या सत्रात धार्मिक विधी पार पडणार आहेत.तर दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर भजनीकलाकार सुश्राव्य भजने सादर करणार आहेत. या जत्रोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गावच्या देवस्थानच्या वतीने…

Read More

सकारात्मक दृष्टीने काम करा,यश तुमचेच;सदाशिव पांचाळ

⚡कणकवली ता.१५-: आपल्या नजरेसमोर ध्येय्य नाही तोपर्यंत पाहिजे तसे घडू शकत नाही. ध्येय्य मोठे ठेवले पाहिजे तरच आपले यशही तेवढेच मोठे असेल. त्यासाठी सकारात्मक दृष्टीने काम करा, यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन माइंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी तळेरे येथे केले.  स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाचनालयाने 10 वी व 12 वीच्या मुलांसाठी आयोजित केलेल्या…

Read More

विज्ञान प्रदर्शनात त्रिमूर्ती माध्य. विद्यालय शिरवंडेचे दुहेरी यश

⚡कणकवली ता.१५-: मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला दुहेरी यश प्राप्त झाले आहे. माध्यमिक गटात विद्यार्थी निर्मित फवारणी यंत्र या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. इयत्ता आठवीतील कु. निखिल प्रकाश भावे या विद्यार्थ्यांने अगदी टाकाऊ वस्तूंचा…

Read More

माडखोल येथील अपघातात दोन युवक जखमी…

सावंतवाडीतील युवकांचा समावेश; अधिक उपचारसाठी गोवा बांबोळी येथे हलविले;इनोव्हा आणि दुचाकीत झाला अपघात ⚡सावंतवाडी ता.१५-: माडखोल येथे दुचाकी – इनोव्हा यांच्यात झालेला अपघातात सावंतवाडी येथील दोन युवक गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी त्यांना तात्काळ सावंतवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.हा अपघात आज…

Read More

घर सजावट स्पर्धेत दिप्ती म्हाडगुत, रांगोळी स्पर्धेत मोनिका कोदे प्रथम

मंडळ सजावट स्पर्धेत आंबेआळी मित्रमंडळ प्रथम ⚡कणकवली ता.१५-: परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 119 व्या जन्मोत्सवानिमित्त भालचंद्र महाराज संस्थान व वाळकेश्‍वर मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतंर्गत मंडळ, घर सजावट व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.घर सजावट स्पर्धेत दिप्ती म्हाडगुत हिने प्रथम क्रमांक…

Read More

विलवडे गावात १६ ते १८ जानेवारी स्वच्छ्ता मोहीम

स्वच्छ गाव, सुंदर गाव हरित मोहीम अंतर्गत उपक्रम;एस आर दळवी फाऊंडेशन आणि विलवडे ग्राम पंचायतचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.१५-: राज्यस्तरीय कार्यक्षेत्रअसलेल्या एस. आर. दळवी फाऊंडेशन आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विलवडे गावात पर्यावरण संतुलनासाठी ‘स्वच्छ गाव सुंदर गाव हरित गाव’ या संकल्पनेतून सोमवारी १६ ते १८ जानेवारी अशी सलग तीन दिवस स्वच्छता व जनजागृती मोहीम…

Read More

कोंडुरा तिठ्यावर 18 रोजी मनसेचा मेळावा

⚡बांदा ता.१५-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिक मार्गदर्शन भव्य मेळाव्याचे आयोजन दि.18 जानेवारी रोजी पारिजात हॉल कोंडुरा तिठा येथे दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सरचिटणीस संदीप दळवी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील सर्व सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी माजी संपर्क…

Read More

सावंतवाडीत भव्य क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ…

परशुराम चलवाडी यांच्या उपस्थितीत सोनाप्पा लाखे यांनी वाढविले श्रीफळ;रासाई युवा कला क्रीडा मंडळ, अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी समाज यांचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१५-: रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी समाजांच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर भव्य दिव्य असा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त उद्योजक परशुराम चलवाडी यांच्या…

Read More
You cannot copy content of this page