माडखोल येथील अपघातात दोन युवक जखमी…

सावंतवाडीतील युवकांचा समावेश; अधिक उपचारसाठी गोवा बांबोळी येथे हलविले;इनोव्हा आणि दुचाकीत झाला अपघात

⚡सावंतवाडी ता.१५-: माडखोल येथे दुचाकी – इनोव्हा यांच्यात झालेला अपघातात सावंतवाडी येथील दोन युवक गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी त्यांना तात्काळ सावंतवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.हा अपघात आज सकाळी घडला आहे.

याबाबतची अधिक माहिती आशी की सकाळी हे दोन तरूण माडखोल येथून आपल्या दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या इनोवा कारला जोरदार धडक दिली यात हे तरुण गंभीर जखमी झाले. चिन्मय चितारी (वय 16) व सर्वेश गावडे (वय 16) असे या तरुण जखमीची नावे आहेत. दरम्यान या अपघाता बाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page