⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील जागृत देवस्थान असलेल्या पटकीदेवी जरीमरी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १७ जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
सकाळच्या सत्रात धार्मिक विधी पार पडणार आहेत.तर दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर भजनीकलाकार सुश्राव्य भजने सादर करणार आहेत. या जत्रोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गावच्या देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
