Headlines

मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव…

विविध कार्यक्रमांचे आयोजन..

⚡मालवण ता.२१-:
मालवण मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर रोजी पर्यंत सायंकाळी ७ वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, दि. २८ रोजी रात्री ८ वा. श्री देव ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ वरची देवली यांचे भजन (बुवा – श्री. महेश नाईक पखवाज – बंटी कांदळगावकर), दि. २९ रोजी रात्री ८ वा. श्री देव शंकर मंदिर मेढा येथील महिला वारकरी दिंडी भजन मंडळ, दि. ३० रोजी रात्री ८ वा. राम कृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुल तेंडोली शाखा मालवण आयोजित प्रभूरंग कार्यक्रम, ३१ रोजी रात्री ८ वा. घुमडाई प्रासादिक भजन मंडळ घुमडे यांचे भजन, दि. १ सप्टेंबर रोजी अष्टपैलू कलानिकेतन प्रस्तुत भक्तीरंग गायनाचा कार्यक्रम, दि. २ रोजी रात्री ८ वा. वैभव मांजरेकर प्रस्तुत भक्ती श्रावण कार्यक्रम (गायक – संगीत अलंकार प्रफुल्ल रेवंडकर व महेंद्र मराठे), दि. ३ रोजी रात्री ८ वा. ह.भ.प कुमारी वेदिका परशुराम लुडबे हिचे सुश्राव्य कीर्तन, दि. ४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रात्री ८ वा. ह.भ.प श्री दर्शन महेश वझे यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच कृष्ण जन्मानंतर रात्री १२:३० वा. मुरलीधर मंदिर ते राम मंदिर पालखी सोहळा होणार आहे. तर दि. ५ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, दि. ६ रोजी सायंकाळी ४ वा. दहीहंडी (दहीकाला) व नंतर सायं. ५ वा. मालवण बाजारपेठ मार्गे मौनिनाथ मंदिर मेढ़ा मार्गे पालखी सोहळा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव मुरलीधर मंदिर बालगोपाळ मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page