वेंगुर्लेत जबरदस्त मंडळाच्या रक्तदान शिबीरात 45 रक्तदात्यांचे रक्तदान

रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ले ता.१४-: जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ वेंगुर्ले राऊळवाडा यांनी “गरुडझेप” महोत्सवातंर्गत शनिवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 45 जणांनी रक्तदान केले.
जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा वेंगुर्लाने गरुडझेप महोत्सव 2023 अंतर्गत वेंगुर्ले साकव येथील मीना काँम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कलावलय वेंगुर्ले संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले नगर पाfरषदेच्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, भाजपाचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, डॉ. जाई नाईक, सारस्वत बँकेचे जितेंद्र सामंत, श्री.. नाईक, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, देवेंद्र गावडे, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग या विभागाचे अध्यक्ष संजय पिळणकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष अँलिस्टर ब्रिटो, सचिव बाबल गवंडे, प्राजक्त रेडकर, अनिल खाडे, जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडा, वेंगुर्लेचे अध्यक्ष साबाजी राऊळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी रक्तपेढीचे डाँ. आदीत्य गर्जे, अधिपरीचारीका मानसी बागेवाडी यांनी तसेच जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, तसेच मंडळाचे कार्यकर्ते मंगेश परब, सिध्देश रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनंत रेडकर, कौशल मुळे, स्वप्नील पालकर, प्रांजल वेंगुर्लेकर, सागर शिरसाट, बबन आंदुर्लेकर शिवाजी राऊळ, चिंटू राऊळ, संजय भाटकर, शेफाली खांबकर, मनाली रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, नाथा बोवलेकर, नील नांदोडकर याbनी पाfरश्रम घेतले.
या रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ यांनी केले.

You cannot copy content of this page