माजी उपसभापती राजू परुळेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिले निवेदन
मालवण (प्रतिनिधी)
गोठणे आचरा मुख्य रस्ता ते यशवंत वाडी मार्गे बिडवाडी जाणारा रस्ता तसेच गोठणे गावठण घाडीवाडी ते सडेवाडी जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण व्हावे, अशी मागणीचे निवेदन माजी उपसभापती राजू परुळेकर व इतर पदाधिकारी यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन राणे यांना सादर केले आहे.
यावेळी राजू परुळेकर यांच्यासमवेत गोठणे गावातील दयाळ हाटले, गोठणे उपसरपंच बाळा परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मालवण तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावंकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
