Headlines

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणार

खनिकर्म व बंदरे विकास मंत्रीना.दादासाहेब भुसे यांची ग्वाही ⚡कणकवली ता.१२-: राज्याचे खनिकर्म व बंदरे विकास मंत्री ना.दादासाहेब भुसे यांची जंजिरा या निवासस्थानीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनीबाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेत विजयदुर्ग बंदर विकास व अवैध वाळू विकास यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना नेते ब्रिगे.सुधीर सावंत यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख…

Read More

कणकवली सार्व.बांधकाम विभागात राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांची जयंती

⚡कणकवली ता.१२-: सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी उप कार्यकारी अभियंता के.के.प्रभू, लेखापाल विजेंदर सिंग, अभियंता वर्षाराणी सूर्यवंशी, अभियंता संजीवनी थोरात, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रथम राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या…

Read More

शाळा सुटली:१५ मिनिटे वाहनांना ब्रेक

बांदा बाजारपेठ जिल्हा परिषद शाळेच्या पालकांनी लावला फलक बांदा/प्रतिनिधीबांदा बाजारपेठेत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेची पटसंख्या ३०० हून अधिक असल्याने सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत चारचाकी वाहनांना १५ मिनिटे प्रवेश बंदी करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेत मार्गदर्शक फलक उभारला. यावेळी पालक व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी स्वतः थांबून वाहतूक थांबविली. शाळेतील विद्यार्थी मार्गस्थ झाल्यानंतरच वाहनांना प्रवेश देण्यात आला.जिल्हा…

Read More

पोलीस भरतीच्या मैदाणीसाठी ५ हजार ५९४ उमेदवारांची हजेरी

मैदानी चाचणी संपली:आता होणार लेखी परीक्षा: पात्र यादी लवकरच होणार प्रसिद्ध ओरोस ता.१२-“ जिल्ह्यात १२१ पोलीस पदांच्या रिक्त पदासाठी पदवीधर व उच्च शिक्षित तरुणांची उपस्थिती लक्षणीय असून विज्ञान, संगणक विज्ञान, कला, वाणिज्य पदवीधरसह पदव्युत्तर उमेदवारांचा भरणा आहे. विद्या विभूषित उमेदवार आल्याने जिल्हा पोलिस दलाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ…

Read More

फोंडाघाट स्मशानभूमी पाण्याची केली सोय

फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांचा नवा आदर्श ⚡कणकवली ता.१२-: फोंडाघाट नूतन सरपंच सौ संजना संजय आग्रे यांनी फोंडाघाट गावातील प्रलंबीत असलेल्या अत्यावश्यक सुविधांमधील असणाऱ्या समस्या सोडवून एक नवा आदर्श घालून दिला.     फोंडाघाटच्या नूतन सरपंच सौ. संजना आग्रे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात फोंडाघाट ग्रा.पं.च्या सभागृहात पार पडला. यानंतर फोंडाघाटमधील नागरिकांसाठी अत्यंत अडचणीचा असणारा प्रश्न म्हणजे स्मशानभूमीतील…

Read More

भालचंद्र बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त शिबिरात ११९ रक्तदात्यांचे रक्तदान

⚡कणकवली ता.१२-: परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११९ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भालचंद्र महाराज संस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ११९ जणांचे रक्तदान करण्याचा संकल्प आयोजकांच्या वतीने करण्यात आला होता.या शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार विजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भालचंद्र महाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत, डॉ. विद्याधर तायशेटे,खजिनदार…

Read More

त्सुनामी आयलंड पुनर्जीवित होणार

माजी खासदार निलेश राणे यांचा पुढाकार ⚡मालवण ता.१२-: देवबाग कर्ली खाडी पात्रातील त्सुनामी आयलंड गेल्या दोन वर्षापासून पाण्यात पूर्णपणे बुडून नष्ट होत असल्याने जल पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेले देवबाग खाडीतील आयलंड पुनर्जीवीत करावे अशी मागणी पर्यटन व्यवसायिकांनी माजी खासदार निलेश राणे यांचीही भेट घेऊन केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाचे अधीक्षक…

Read More

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लवकरच स्वतःची वेबसाईट बनवावी

व्यापारी संघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधीमहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कणकवली येथे संपन्न झालेल्या ३४ व्या एकता मेळाव्याला संबोधित करतांना महासंघाच्या सदस्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स मार्फत मोफत वेबसाईट बनवून देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या या सुविधेचा लाभ घेऊन सिंधुदुर्गातील…

Read More

कोळब गावासाठी स्वतंत्र तलाठी, पोलीस पाटील द्या

सरपंच, उपसरपंच शिष्टमंडळाची मागणी ⚡मालवण ता.१२-: कोळंब गावासाठी कायमस्वरुपी तलाठी, पोलीस पाटील मिळावा, या मागणीसाठी सरपंच सौ. सीया धूरी व उपसरपंच विजय नेमळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मालवणचे तहसीलदार श्रीपाद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोळंब ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील तलाठी कार्यालय येथे कार्यरत असणारे तलाठी हे कोळंब, मिर्याबांदा व रेवंडी या गावांसाठी एकच आहेत. त्यामुळे…

Read More

वराडकर हायस्कूल कट्टाच्या माजी विद्यार्थी संघ अध्यक्षपदी अनिल फणसेकर यांची निवड

⚡मालवण ता.१२-: मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या माजी विद्यार्थ्यांची सभा प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून माजी विदयार्थी संघाच्या अध्यक्षपदी वराडकर हायस्कूलचे माजी विदयार्थी तथा माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे…

Read More
You cannot copy content of this page