⚡मालवण ता.१५-: मालवण येथील भंडारी हायस्कूलतर्फे आयोजित आणि भंडारी हायस्कूल दहावी १९७१- ७२ बॅचतर्फे पुरस्कृत मालवण तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत भंडारी हायस्कूल येथे होणार आहे. ही स्पर्धा पहिले ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटांत होणार आहे.
प्रत्येक गटात प्रत्येक प्रशालेतील फक्त पाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक गटासाठी प्रथम १५००, द्वितीय १ हजार, तृतीय ५००, तर उत्तेजनार्थ २५० रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रवेशाची अंतिम तारीख २० फेब्रुवारी असून विद्यार्थ्यांनी भंडारी हायस्कूलमध्ये (क्र. ९४२२९६३५४२) नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
