शिवजयंती निमित्त कणकवली मराठा समाज प्राथमिक शिक्षक आयोजित विविध स्पर्धा

यामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
गट क्र .१-इ .५ वी पर्यंत -शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग
गट क्र .२-इ .६वी ते ८ वी- राजमाता जिजाबाईंचे स्वराज्यासाठीचे योगदान किंवा छत्रपती शंभूराजे. गट क्र .३-९ वी ते १२ वी-छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी आणि शेतीविषयक धोरण किंवा शिवराज्याभिषेक. यासाठी प्रथम -१००० रु,द्वितीय-७०० रु.
तृतीय-५०० रु.बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.वक्तृत्व स्पर्धा सकाळी ११ वाजता सुरू होईल.वक्तृत्व स्पर्धा वेळ मर्यादा खालील प्रमाणे –
गट क्र .१- ४ते५ मिनिटे.गट क्र .२- ५ते ६ मिनिटे.गट क्र .३- ६ते ७ मिनिटे.नाव नोंदणीसाठी
संतोष देसाई (9405328242)
सचिन सावंत (9021858597)
यांच्याशी संपर्क करावा.
चित्रकला स्पर्धा-गट-अ इयत्ता ५ वी पर्यंत-विषय-सिंधुदुर्ग किल्ला किंवा शिवाजी महाराज.गट -ब इयत्ता ६ वी ते ८ वी विषय-शिवाजी महाराजांचे सिंहासन आरूढ व्यक्तिचित्र किंवा माझा आवडता किल्ला.गट अ व ब साठी
प्रथम-५००,द्वितीय-३००, तृतीय-२०० बक्षीस दिले जाणार आहे.सदर चित्रकला स्पर्धा सकाळी ११.३० ते १.०० या वेळेत होईल.चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदणी हेमंत राणे- (9404169984),संतोष राणे -9881104804 यांच्याशी संपर्क साधावा.स्पर्धेचे ठिकाण-छत्रपती शिवाजी महाराज चौक,(पंचायत समिती जवळ)कणकवली येथे होणार आहे .सर्व विजेत्यांचे बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येतील . बक्षिसाचे स्वरूप सन्मानचिन्ह , रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.
नाव नोंदणी १७ फेब्रुवारी २०२३ पर्यत करावी.तरी जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

⚡कणकवली ता.१५-: शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती जवळ , कणकवली येथे रविवार १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केला आहे . शिवजयंती निमित्त कणकवली मराठा समाज प्राथमिक शिक्षक आयोजित विविध स्पर्धा पार पडणार आहेत.

You cannot copy content of this page