⚡कणकवली ता.१५-: राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी कणकवली येथे उपस्थित राहत
सिंधुदुर्गातल्या सेविकांचे एकत्रीकरण करत मार्गदर्शन केले.
कणकवली येथील जानवली पुलाजवळ हॉटेल बावर्ची येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन,
स्वागत आणि परिचय,वैयक्तिक पद्य ,प्रात्यक्षिक ,सांघिक पद्य , राष्ट्रसेविका समिती, सिंधुदुर्ग, स्थापना, वाटचाल याविषयीचे चित्रफीतदर्शन व त्यानंतर शांताक्काजींचे मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते यावेळी शांताक्काजी यांनी उपस्थित सेविकांच्या शंकाचे निरसन केले.
यावेळी जिल्हा कार्यवाहीका सौ. मालती काळे व जिल्हा सहकार्यवाहीका सोनाली चन्ने तसेच राष्ट्रसेविका समिती गोवा येथील प्रांत संपर्कप्रमुख विजू ताई उमर्ये आणि राजश्रीताई जोग उपस्थित होते.
