वेंगुर्ले तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसाची रिक्त पदे भरण्यास सुरुवात

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुका अंतर्गत २२ अंगणवाडी केंद्रात मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  यामध्ये न्हैचिआड, होडावडा, गिरपवाडी, मूठ, वरचेमाड, कुर्लेवाडी, मोचेमाड, आवरवली, कनयाळ, गावतळे, म्हारतळे, बोमडोजीचीवाडी, बागायत, खालची केर, शिरोडा, सोन्सुरे, आवेरे, वेतोरे-वरचीवाडी, पिपळगाव, कोचरा, मळई, गवाण आदी अंगणवाडींचा समावेश आहे. उमेदवारांनी आपले अर्ज १५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाल विकास प्रकल्प, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वेंगुर्ला यांच्या कार्यालयात आणून द्यावेत असे आवाहन केले आहे.
You cannot copy content of this page