रोणापाल लिंग महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भरगच्च कार्यक्रम

⚡बांदा ता.१५-: या वर्षी प्रथमच श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल व श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल सर्व शिवभक्तांसाठी खास पर्वणी म्हणुन श्री लिंग महादेव मंदिर रोणापाल येथे खास महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
महाशिवरात्री दिवशी सकाळी
सकाळी ठीक ८ वा. श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल यांचा शिवकवच अकरा आवर्तन अभिषेक, त्यानंतर सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वा. शिवभक्तांना लिंग महादेवाचे अभिषेक करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद दुपारी १२.३० ते २.०० वा तसेच रात्रौ ८ वा. सातेरी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर, कुडाळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. ज्या भाविकांना अभिषेक करावयाचा आहे त्यांनी बाबल तुयेकर ९०११८४८४५३, बबन सावंत सर ९३७०८१५४७५ यांच्याकडे नाव नोंदणी करुनच अभिषेक करता येईल. नाव नोंदणीचा अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page