Headlines

*आंबोलीत “ड्रिंक अँड ड्राईव्ह” तपासणी केंद्र उभारा…

सरपंच सौ. सावित्री पालेकर: ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची केली मागणी..

⚡सावंतवाडी,ता.२०-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे कायमस्वरूपी मद्यपान तपासणी केंद्र आणि ट्रॉमा केअर सेंटर तातडीने उभारावे, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच सौ.सावित्री पालेकर आंबोलीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आंबोली घाटातून बेळगाव, कोल्हापूरला जोडणाऱ्या महामार्गावरून दररोज मोठ्या संख्येने अवजड व प्रवासी वाहने ये-जा करतात. या ठिकाणी मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गेल्या काही महिन्यांत अनेक भीषण अपघात घडले असून त्यात जीवितहानीही झाली आहे.अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी यासाठी आंबोली परिसरात ट्रॉमा केअर सेंटरची नितांत आवश्यकता आहे. सध्या जखमींना उपचारासाठी सावंतवाडी, पणजी किंवा बेळगाव येथे न्यावे लागते. त्यामुळे उपचारात होणारा विलंब जीवावर बेतत आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने राज्य शासनाकडे आंबोली येथे कायमस्वरूपी “ड्रिंक अँड ड्राईव्ह” तपासणी केंद्र आणि ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची लेखी मागणी केली आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच पर्यटनालाही चालना मिळेल, असे ही सौ. पालेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page