Headlines

सावंतवाडीत आयुर्वेद ओपीडीचा मार्ग मोकळा…

देव्या सूर्याजी यांच्या आंदोलनाला यश; दोन महिन्यांत मोफत आरोग्यसेवा सुरू होणार..

सावंतवाडी : केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांना बाह्यरुग्ण विभाग‌ (ओपीडी) चालू करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान यांच्यामध्ये होणा-या सामंजस्य कराराच्या मसु‌द्याला आज मान्यता देण्याबाबत सभागृहात मंजूरी देण्यात आली. यासाठी नगरसेवक तथा उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी आभार व्यक्त केले आहेत. श्री. सुर्याजी यांनी यासाठी स्वातंत्र्य दिनी सावंतवाडी नगरपरिषद समोर धरणे आंदोलन छेडले होते.त्यांच्या आंदोलनाला यश आलं असून लवकरच ही ओपीडी शहरात सुरू होणार आहे.

आयुष मंत्रालयाच्या मागणीनुसार पाणी, वीज बील अन् कर माफ करण्याचा निर्णय आजच्या विशेष सभेत घेण्यात आला. तर शहरवासीयांकडून केस पेपरसाठीचे पैसे घेऊ नये असे करारात नमूद असावे असे ठरविण्यात आले.यावेळी नगरसेवक श्री.देवेंद्र टेमकर यांनी नगरसेवक देव्या सुर्याजी यांचे अभिनंदन केले.स्वातंत्र्य दिनी यासाठी धरणे आंदोलन छेडले होते. शिवसेना नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज यावर विशेष सभेचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्याप्रमाणे आयोजन करून निर्णय घेण्यात आला. आजच्या ठरावामुळे येत्या दोन महिन्यांत ही ओपीडी शहरात सुरू होणार असून मोफत सुविधा तिथे उपलब्ध होणार आहेत. येत्या दोन महिन्यांत ही सेवा कार्यान्वित होईल, अशी माहिती नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी दिली आहे. या ओपीडीमुळे गोवा धारगळ येथे जाणाऱ्या रुग्णांना शहरातच आरोग्य सुविधेचा लाभ उपलब्ध होणार आहे.मोफत औषध पुरवठा देखील होणार असून जिल्हावासीयांनाहि याचा फायदा होणार आहे याबद्दल शहरवासियांनी समाधान व्यक्त केलं आहे.

You cannot copy content of this page