गोगटे – वाळके कॉलेज मध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

२ मार्चला होणार स्पर्धा

बांदा/प्रतिनिधी
शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित येथील गोगटे-वाळके कॉलेज बांदा आणि श्रीमती चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी (ता. गडहिंग्लज) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या पातळीवर एकपात्री अभिनय स्पर्धा गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक पाच हजार रुपये आणि आकर्षक प्रशस्तीपत्र (कै.) चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री यांच्या स्मरणात प्रा. डॉ. किशोर कल्लापा म्हेत्री यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले आहे. द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व आकर्षक प्रशस्तीपत्र (कै.) शालन उर्फ ताई आनंदा शिर्के यांच्या स्मरणात प्रा. अनिल शिर्के यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले आहे. तृतीय क्रमांकासाठी पंधराशे रुपये व आकर्षक प्रशस्तीपत्र (कै.) यशोदाबाई सिताराम गावडे यांच्या स्मरणात प्रा. रमाकांत सिताराम गावडे यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले आहे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक 1000 रुपये आकर्षक प्रशस्तीपत्र (कै.) चंद्रकांत कांबळे यांच्या स्मरणात मुकुंद चंद्रकांत कांबळे यांनी पुरस्कृत केले आहे. सांस्कृतिक आदान प्रदानता व्हावी, बुजुर्ग कलावंत ते नवोदित कलावंतांना हक्काचा रंगमंच उपलब्ध व्हावा ” या उद्देशाने या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत वय वर्ष १० नंतरची कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. किमान सात मिनिटे व कमाल दहा मिनिटापर्यंत एका कलावंताला सादरीकरण करता येईल. ही स्पर्धा मराठी भाषेत होईल. प्रत्येक स्पर्धकाला प्रवेश फी शंभर रुपये असेल. या स्पर्धेबाबत इतर नियम व अटी स्पर्धेच्या वेळी सांगण्यात येतील. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्यावतीने या स्पर्धेचे परीक्षण होणार असून तरी जास्तीत जास्त कलावंतानी या स्पर्धेत सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी तसेच या स्पर्धेबाबत अधिक माहिती करिता संयोजन समितीचे प्रा. आर. एस .गावडे (मो. ९१४६५६२९७९), प्रा. अनिल शिर्के (मो. ९४२३८१५०९६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व चंद्राबाई म्हेत्री ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर कल्लाप्पा म्हेत्री यांनी केले आहे.

You cannot copy content of this page