वागदे येथे तब्बल ७ लाख २० हजाराची दारू पकडली…
⚡कणकवली ता.२४-: मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथे गोवा बनावटीची दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात ताब्यात घेण्यात आलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोमधून ७ लाख २० हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या नगरपरिषदा…
