⚡कुडाळ ता.२५-: भारत स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कु. अक्षता जाधव, कु.धनश्री कुपेरकर, ज्ञानदा मेस्त्री व भावेश मेस्त्री ह्या विद्यार्थ्यांनी नेताजींचं स्वातंत्र्यलढ्यातील कार्य,नेतृत्व आदि विषयावर मुद्देसूद भाषणे केली. या प्रसंगी प्राचार्य डॉ.युवराज पांढरे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
एस पी एस फार्मसी कॉलेज मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी…
