२१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त,:एकावर गुन्हा दाखल..
⚡बांदा ता.२५-: बांदा-लकरकोट, येथे बेकायदेशीररित्या विनापरवाना दारूसाठा बाळगल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रजि. नं. ०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोना/११८६ विलास पांडुरंग भोगले (बांदा पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव संतोष बाबाजी चव्हाण (वय ४४) असून तो मूळचा तळवडे खेरवाडी, ता. सावंतवाडी येथील रहिवासी असून सध्या विरार, जिल्हा पालघर येथे वास्तव्यास आहे.
ही घटना दि. २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास लकरकोट, बांदा येथे घडली. याप्रकरणी रात्री ११.४८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी कारवाई करत २१,६०० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. जप्त मालामध्ये एका निळ्या रंगाच्या पिशवीत “OAKSMITH INTERNATIONAL BLENDED WHISKY” असे इंग्रजी लेबल असलेल्या गोवा बनावटीच्या १८० मिलीमापाच्या एकूण ९० कंपनी सिलबंद प्लास्टिकच्या बाटल्या (प्रति बाटली किंमत २४० रुपये) आढळून आल्या.
सदर गुन्हा एस. यु. गवस यांनी दाखल केला असून पुढील तपास WHC/६७ धर्णे (बांदा पोलीस ठाणे) करत आहेत.
