महायुतीविरोधात काम केल्यास वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही…

वेंगुर्ला तालुका महायुतीच्या बैठकीत निर्णय..

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तालुक्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीत लढत असून जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक संदर्भात आज शनिवारी भाजपा तालुका कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न झाली. यावेळी 27 जानेवारी नंतरही महायुतीविरोधात जाऊन काम केल्यास वरिष्ठ स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आजच्या वेंगुर्ला महायुतीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती साठी उमेदवारी निश्चिती केली आहे. त्यानुसार जि. प. साठी भाजपा 3 व शिवसेना 2 उमेदवार महायुतीतर्फे निश्चित करण्यात आले आहेत. तर 10 पंचायत समिती गण साठी 5 मतदारसंघ भाजपा व 5 मतदारसंघ शिवसेना लढत आहे. दरम्यान काही बहुतांशी ठिकाणी एकमेकाविरोधात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी अन्य भाजपा – शिवसेना उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान तालुक्यात महायुती एकत्रित लढत असून दोन्ही पक्षाच्या विरोधात जाऊन काही उमेदवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या दिनी 27 जानेवारी रोजी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान त्यानंतरही दोन्ही पक्षांकडून उमेदवार यांनी
पक्षाच्या विरोधात जाऊन काम केल्यास संबंधित महायुतीतील ज्येष्ठ पदाधिकारी संबंधितावर त्या त्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करतील, असे सूचित करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, ज्येष्ठ नेते शरदजी चव्हाण, जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सुधीर पालयेकर, प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये व अन्य, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत व अन्य, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, राहुल गावडे, मंडल कार्यकारिणी सदस्य तसेच शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई, जिल्हा संघटक सुनील डूबळे, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, तालुका संघटक बाळा दळवी, अण्णा वजराटकर, पंकज शिरसाट, हर्षद डेरे, स्वप्नील गावडे आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page