वेंगुर्लावायंगणी श्री देव काजरेश्वर मंदिर येथे उद्या “ब्रह्मकुंड परिक्रमा”…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला तालुक्यातील
वायंगणी कामतवाडी येथील श्री देव काजरेश्वर सेवा समिती मार्फत रविवार दि २५ जानेवारी २०२६ रोजी रथसप्तमी या तीथीचे औचित्य साधुन नवसाला पावणारा श्री देव काजरेश्वराचा ११ वा वार्षिकोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्येसकाळी ८ वा. श्री देव काजरेश्वर पुजा होमहवन, अभिषेक, लघुरूद्र, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी १२.३० वा. श्री सत्यनारायण महाआरती,
दुपारी १.३० वा. महाप्रसाद,
सायंकाळी ५ वा. स्थानिक ग्रामस्थांची भजने,
सायंकाळी ७ वा. जय हनुमान पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ, आरोस दांडेली यांचा
“ब्रह्मकुंड परिक्रमा” हा
महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव काजरेश्वर सेवा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कामत व सचिव आनंद रेवणकर यांनी केले आहे.

फोटो

You cannot copy content of this page