वाहून गेलेल्या युवकाचा अजून शोध नाही ; मोहीम थांबवली…

नदी पात्रातील गाळाचा मुद्दा ऐरणीवर :यापूर्वीसुद्धा घडल्यात दुर्दैवी घटना.. कुडाळ : तालुक्यात माणगांव खोऱ्यातील वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, या.माणगांव धरणवाडी) व सखाराम शंकर कानडे (६३,रा.माणगांव डोबेवाडी) हे दोघेही सोमवारी रात्री ८ वा.च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने…

Read More

शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत यांची नियुक्ती…

मालवण दि प्रतिनिधी :शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निलेश बाईत यांना सुपूर्द करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, हिंदूहृदय् सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवससेनेचे मुख्य नेते…

Read More

आंबोली जिल्हापरिषद मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून संदीप गावडे यांनी केले मोफत वह्या वाटप…!

⚡सावंतवाडी ता.२४-: प्रतिवर्षी प्रमाणे संदिप गावडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी देखील श्री गावडे यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप उपक्रम राबवण्यात आला. यंदाचे वर्ष हे या उपक्रमाचे ८ वे वर्ष आहे. आज संपूर्ण आंबोली जिल्हापरिषद मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होणे फार महत्वाचे आहे हाच…

Read More

स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे वाद्यपूजन व वादकांचा सन्मान सोहळा संपन्न…

⚡मालवण ता.२४-:मालवण येथील स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे वाद्यपूजन सोहळा व वादकांचा मेळावा मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी मालवण मधील विविध वाद्य प्रकारातील वादकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ५५ ढोल व १५ ताशांच्या साहाय्याने ढोल- ताशा वादकांनी नाट्यगृह परिसरात केलेल्या वादनाने आसमंत दुमदुमून गेला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या…

Read More

देऊळवाडा येथील मातीचा भराव काढून टाकून मोरी खुली करावी…

ह्युमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शनची मागणी.. ⚡मालवण ता.२४-:मालवण देऊळवाडा येथे बांधलेल्या मोरीच्या तोंडावर मातीचा भराव टाकून ती बुजविण्यात आल्याने भरडेवाडा व आडवण येथून येणारे पावसाचे पाणी अडले जाऊन तेथील घरांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा भराव काढून टाकावा, अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शन, मालवण तर्फे मालवण नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन…

Read More

जलजीवन मिशन अंतर्गत मालवण पंचायत समितीमध्ये प्रशिक्षण शिबीर संपन्न…!

⚡मालवण ता.२४-:जल जीवन मिशन अंतर्गत टप्पा-३ (स्तर-३) मध्ये समाविष्ट पात्र ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना उद्देशून, पंचायत समिती मालवणच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जेपीएस फाउंडेशन, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी जल स्रोतांचे योग्य…

Read More

वायरी भूतनाथ, चिंदर, आचरा या ग्रामपंचायतींना कायमस्वरूपी ग्राम अधिकारी द्यावा…

काँग्रेसची मागणी: गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡मालवण ता.२४-: मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीसह चिंदर व आचरा ग्रामपंचायतीला कायम स्वरूपी ग्राम अधिकारी मिळावा, अशी मागणी यासाठी आज वायरी भूतनाथ व चिंदर – आचरा विभागातील काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. श्याम चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. वायरी भूतनाथ, आचरा, चिंदर येथील राष्ट्रीय…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी १४ लाखांचा निधी मंजूर…

सावंतवाडी, प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील जुन्या आणि नव्या इमारतीमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी सात लाख, असे एकूण १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे बंदर व मत्स्य विभाग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने या निधीला मंजुरी दिली असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यासाठी…

Read More

वाघोली येथील घरावर शेगलाचे झाड पडल्याने घराच्या छपराचे नुकसान…!

⚡बांदा ता.२४-: वाफोली अन्नपूर्णावाडी येथील गणेश बाबाजी सावंत यांच्या राहत्या घरावर शेगलाचे झाड पडल्याने घराच्या छपराचे नुकसान झाले. आज सकाळी झालेल्या वादळी पावसात हि घटना घडली.आज सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस कोसळत आहे. सावंत यांच्या घराच्या छपरावर झाड पडल्याने सिमेंट पत्रे फुटले. यामुळे सावंत यांचे नुकसान झाले आहे.

Read More

दाभोसवाडा विठ्ठल मंदिरात अखंड विणा सप्ताहाला प्रारंभ…

वेंगुर्ला प्रतिनिधी- सुमारे शंभरपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात २३ जूनपासून अखंड विणा सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. फोटोओळी – दाभोसवाडा विठ्ठल रखुमाई

Read More
You cannot copy content of this page