सावंतवाडीत सालईवाडा परिसरात घडले हिट अँड रन ची घटना…

रवींद्र मंगल कार्यालयासमोर अज्ञात वाहनाची जोरदार धडक: सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध, संबंधित वाहन चालकाचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी, संबंधित मालकाची मागणी..

⚡सावंतवाडी ता.२४-: येथील सालईवाडा परिसरातील रवींद्र मंगल कार्यालयासमोर काल रात्री उभ्या असलेल्या वाहनाला तसेच समोरील संरक्षण भिंतीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. या अपघातात संबंधित वाहनमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोषी वाहनाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी मालकाकडून करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सालईवाडा परिसरात रवींद्र मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या जनरेटर वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाने समोरील संरक्षण भिंतीलाही ठोकर दिली व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जनरेटर वाहनाचे तसेच संरक्षण भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संबंधित वाहनाचे फुटेज कैद झाले असून पोलिसांनी त्याआधारे त्वरित तपास करून दोषी वाहनाचा शोध घ्यावा, अशी मागणी वाहनमालकांनी केली आहे.

या प्रकरणी पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page