⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली श्री देव सोमेश्वर मंदिर येथून पंढरपूर वारी साठी पंचक्रोशीतील वारकरी बांधव रवाना झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वारकरी बांधवांचे आशीर्वाद घेऊन पंढरपूर वारीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मनीष दळवी यांनी आडेली ग्रामदैवत श्री देव सोमेश्वराचे दर्शन घेतले.
वारकरी बांधव बाबल गडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वारीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, नगरसेवक व वारकरी पाईक संदेश निकम, यशश्री नाईक, युवा नेते सौरभ समीर नाईक, यतीन आवळेगावकर, वारकरी बांधव सूर्यकांत धर्णे, उदय आगलावे, बाबल गडेकर, बाळा वाडेकर, भूषण चव्हाण, संदीप माणगावकर, प्रमोद कांबळी, नामदेव गवंडी, सुनील आसोलकर, नीळकंठ सोनसुरकर, हरी कांदे, विलासिनी वराडकर, सौ. गडेकर, बाबाजी येरम, आबा बागवे, हनुमंत येरम, सौ. कुडाळकर आदीसह आडेली, वेतोरे, वजराट व पंचक्रोशीसह वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही वारी आडेली सोमेश्वर मंदिर येथून कोल्हापूर, नरसोबाचीवाडी, पंढरपूर अशी रवाना होणार आहे. यावेळी सर्वच वारकरी बांधवानी मनीष दळवी यांना आशीर्वाद दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांनी आडेली येथे घेतले वारकरी बांधवांचे आशीर्वाद…
