⚡सावंतवाडी ता.२३-:
प्रयाण टुरिझम संस्थेच्या माध्यमातून तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत उपस्थित महिलांना आयोजकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पुढील महिन्यात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर तसेच केरळ येथे सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या सहलीचा लाभ घ्यावा, तसेच इच्छुक महिलांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रयाण टुरिझम संस्थेच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष अपर्णा कोठावळे, अनारोजीन लोबो, भारती मोरे, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, कीर्ती बोंद्रे आदी उपस्थित होत्या.
