वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना – ठाकरे शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी…

⚡वेंगुर्ला ता.२३-: ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची आज शुक्रवारी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्र. तालुकाप्रमुख निलेश चमणकर, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत,अभिमन्यू भुते,आनंद बटा, तुषार सापळे,अभिनव मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख साक्षी चमणकर,सुजित चमणकर, विवेक कुबल, दिलीप राणे, गजानन गोलतकर, अक्षय पावसकर,सुहास मेस्त्री, दिपक केळूसकर,वाल्मिकी कुबल, संदीप केळजी, डेलीन डिसोजा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मठ ग्रामस्थ यांच्या वतीने शिवाजी चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मठ माजी उपसरपंच निलेश नाईक, महेश सावंत, अरविंद बागायतकर, महेश धुरी, अनिल तेंडोलकर, प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.तसेच
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती शिवसेना शाखा वेंगुर्ला येथे प्र.तालुकाप्रमुख सचिन देसाई व जिल्हा संघटक सुनील डूबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर उपजिल्हाप्रमुख
सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, दत्तगुरु परब,मितेश परब, पंकज शिरसाट, गणपत केळुस्कर, उत्तम मोटे, संतोष परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page