बांदा नाक्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीस्वाराला धडक…

वाहनचालक फरार:दुपारी एकाच्या सुमारास घटना; जखमी दुचाकीस्वार रुग्णालयात दाखल..

⚡सावंतवाडी ता.२५-:
सावंतवाडी येथील बांदा नाका परिसरात दुपारी एकाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बांदा नाका परिसरात एका पर्यटकांच्या कार ने एका दुचाकी स्वराला धडक देऊन घटनास्थळावरून फरार झाला. घटनेनंतर काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.जखमी दुचाकीस्वार हा एका वृत्तपत्राच्या कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती मिळत असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page