मालवणमध्ये प्रथमच हेरिटेज टूर गाईड कोर्सचे आयोजन…

⚡मालवण ता.२५-:
मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने ‘हेरिटेज दूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. ११ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण परिसराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभलेला असून मराठा आरमाराचा गौरवशाली इतिहास, किल्ले, मंदिरे, लोककला, खाद्यसंस्कृती व सागरी परंपरा यामुळे हा परिसर जागतिक पर्यटन नकाशावर ओळखला जात आहे. हा वारसा पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित हेरिटेज टूर गाईडची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामध्ये हेरिटेज वॉकसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण, हेरिटेज वॉक व्यवस्थापन, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी, मालवण व आजूबाजूच्या परिसरातील वारसा स्थळांची सखोल माहिती तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्यांचा समावेश आहे. पुणे येथील तज्ज्ञ प्रा. योगेश पिसोळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

१८ वर्षांवरील मालवणमधील विद्यार्थी, पर्यटन व्यवसायिक, पर्यटन संस्थांचे सदस्य, होम स्टे व हॉटेल मालक, चालक, कर्मचारी तसेच रिक्षा व कार चालकांसाठी हा अभ्यासक्रम खुला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगाराच्या संधी, पर्यटन क्षेत्रातील रोजगार हॉटेल व पर्यटन व्यावसायिकांशी टाय अप तसेच मालवणचा इतिहास व वारसा जागतिक स्तरावर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सुमेधा नाईक 9404924678, गुरुनाथ राणे 9420200991 व कृतिका न्हिवेकर 9764358709 यांच्याशी संपर्क साधावा, इच्छुकांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले आहे.

You cannot copy content of this page