Headlines

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरून मध्यावधी निवडणुका लागणार

उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला विश्वास;शरद पवार यांचे ते वैयक्तिक मत असल्याचेही सांगितले मालवण ता.२६(प्रफुल्ल देसाई)-: राज्यातील सत्ता संघर्षावर आज मालवण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना( ठाकरे गट) नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करताना सुप्रीम कोर्टात जी सुनावणी चालली आहे त्या सुनावणीच्या अनुषंगाने सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतर…

Read More

आयनल गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रवीण साटम यांची बिनविरोध निवड…

देवगडआयनल गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रवीण जगन्नाथ उर्फ भाई साटम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.२३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या ग्रामसभेत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सिद्धी दहीबावकर,उपसरपंच विलास हडकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Read More

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनविल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही…

सुभाष देसाई; बाळासाहेबांची रुजिवलेला शिवसेनेचा विचार चोरता येणार नाही… मालवण (प्रतिनिधी) माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हणाले होते. मात्र शिवसेनेने ज्यांना मोठे केले त्यांनीच बाळासाहेबांचे शब्द विसरून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसत आणि भाजपच्या साथीने दगाबाजी करून उद्धव ठाकरे यांचे सरकार खाली खेचले. गद्दारांनी खोटेपणाने शिवसेनेचे नाव…

Read More

अनधिकृत वाळू उत्खननावर कठोर कारवाई करा…

विरेश मांजरेकर व महेश चव्हाण यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी… मालवण (प्रतिनिधी) कर्ली खाडीपात्रात देवली वाघवणे येथे बेसुमार अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असून यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी देवली ग्रामस्थ विरेश मांजरेकर व महेश चव्हाण यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. महसुल प्रशासनाकडून वाळूचे लिलाव जाहीर करुन ते मंजूर केले. त्यानुसार काही वाळूपट्टयामध्ये…

Read More

ग्रामपंचायतीची चौकशी आणि सुनावणी घेण्याच्या पत्रानंतर माजी सरपंचाचे उपोषण 10 दिवस स्थगित

मालवण दि प्रतिनिधी मालवण गटविकास अधिकाऱ्यांनी ५ मार्चपूर्वी प्राप्त सर्व तक्रार अर्जांवर विद्यमान ग्रामसेवक व सरपंच तारकर्ली- काळेथर ग्रा.पं.ची चौकशी व सुनावणी आपल्या दालनात घेण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे मी तहसील कार्यालयासमोरील बेमुदत उपोषण दहा दिवसांसाठी स्थगित केले आहे. अशी माहिती तारकर्लीच्या माजी सरपंच स्नेहा केरकर यांनी दिली. उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासकीय यंत्रणांना उशिरा जाग आल्याचा…

Read More

भूमिगत विजवाहीनीसाठी कुडाळ मालवण तालुक्यासाठी 129 कोटी 39 लाख मंजूर…

विनायक राऊत ,वैभव नाईक, यांचा पाठपुरावा; प्रसिद्धी पत्रकद्वारे दिली माहिती… मालवण (प्रतिनिधी) चक्रीवादळामुळे वीज वितरण विभागाचे दरवर्षी मोठे नुकसान होते. वीज खंडित होऊन नागरिकांना अंधारात रहावे लागते त्यामुळे सिधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या…

Read More

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन सर्वंकष विकास साधावा..

बाळासाहेब पंतवालावलकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीमहाविद्यालयात विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम, स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यानी सहभागी होणे आवश्यक असते. स्पर्धेत सहभागी झाल्यावर यश अपयश येत असते, परंतु विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते म्हणून स्पर्धेत विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला सर्वंकष विकास साधावा असे प्रतिपादन कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांनी…

Read More

मालवण मध्ये युवतीसेना बळकट करण्यासाठी शिल्पा खोत यांनी उचलली पावले…

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युवती सेना बळकट करण्याच्या दृष्टीने युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत यांनी जोरदार पावले उचलली असून सौ खोत यांनी कांदळगाव मध्ये युवती सेनेची संघटनात्मक बांधणी करताना गावात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या केल्या आहेत युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत…

Read More

देवगड पोलिसांनी बुडणाऱ्या खलाशाला वाचविले…

आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम ⚡देवगड ता.२५-: देवगड जेटी नजीकच्या समुद्रामध्ये बोटीवरील एक खलाशी पाण्यात पडून बुडत असल्याची माहिती फोन द्वारे मिळाल्यानंतर तात्काळ देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, सहा.पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जोशी, पोलीस हवालदार अमित हळदणकर, पोलीस शिपाई विशाल वैजल, गणेश चव्हाण निलेश पाटील महिला पोलीस नाईक प्राजक्ता कविटकर व…

Read More

सद्गुरु धर्मराज महाराजांचा
26 रोजी पुण्यतिथी सोहळा

हनुमान मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ⚡कणकवली ता.२५-: श्री सद्गुरु धर्मराज महाराजांचा २२ वा. पुण्यतिथी सोहळा रविवार २६ फेब्रुवारीला कांबळे गल्ली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२.३०वा. समाधीपूजन व लघुरुद्र, दुपारी १२.३० ते १ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा….

Read More
You cannot copy content of this page