सद्गुरु धर्मराज महाराजांचा
26 रोजी पुण्यतिथी सोहळा

हनुमान मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

⚡कणकवली ता.२५-: श्री सद्गुरु धर्मराज महाराजांचा २२ वा. पुण्यतिथी सोहळा रविवार २६ फेब्रुवारीला कांबळे गल्ली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.


सकाळी ९ ते दुपारी १२.३०वा. समाधीपूजन व लघुरुद्र, दुपारी १२.३० ते १ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ४ ते रात्री ८ यावेळेत भजनांचा भरगच्च कार्यक्रम, रात्री ८.३० ते ९ वा. दीपोत्सव व आरती होईल. तरी भाविकांनी या सोहळयात सहभागी व्हावे, असे आवाहन बाळगोपाळ हनुमान मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page