मालवण मध्ये युवतीसेना बळकट करण्यासाठी शिल्पा खोत यांनी उचलली पावले…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युवती सेना बळकट करण्याच्या दृष्टीने युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत यांनी जोरदार पावले उचलली असून सौ खोत यांनी कांदळगाव मध्ये युवती सेनेची संघटनात्मक बांधणी करताना गावात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या केल्या आहेत

युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत यांच्या माध्यमातून शहर व तालुका स्तरावर सातत्याने बैठका घेऊन, नव्या नियुक्त्या जाहीर करत युवती सेनेचा विस्तार व संघटन मजबुतीकरण याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. युवती सेनेची नुकतीच कांदळगाव येथे बैठक संपन्न झाली. यात काही पदाधिकारी नियुक्त्या शिल्पा खोत यांनी जाहीर केल्या आहेत. यात कांदळगाव वार्ड १ : शाखाप्रमुख पदी हर्षदा दिनेश पाटकर, उपशाखाप्रमुख पदी प्रियांका प्रमोद परब, वार्ड २ : शाखाप्रमुख पदी अनुष्का अमोल परब, उपशाखाप्रमुख पदी आशालता दिगंबर परब, वार्ड ३ : शाखाप्रमुख पदी साक्षी भगवान कांदळकर, उप शाखाप्रमुख पदी पूजा सिद्धार्थ कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी कांदळगाव सरपंच रणजित परब यांच्यासह उपसरपंच दिव्या बागवे, सदस्य राजेंद्र कदम, सदस्य अनघा कदम, शाखाप्रमुख दीपक परुळेकर यांसह युवती सेना मालवण उपतालुकप्रमुख रुपा कुडाळकर, शहरप्रमुख निनाक्षी मेतर, मसुरे विभाग प्रमुख आर्या गांवकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, दिया पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page