Headlines

कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर भाजप युवा मोर्चाची स्वच्छ्ता

गौरव लुडबे मित्रमंडळाचे आयोजन;मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला कचरा मालवण दि प्रतिनिधी :भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते गौरव लुडबे मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा यावेळी गोळा करण्यात आला. या मार्गावर सातत्याने अज्ञात नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ बनत होता, दुर्गंधी पसरत होती. मार्गावरून…

Read More

रंगमंचावर वावरणारी चिमुरडी मुले उद्याची भावी कलाकार म्हणून समाजासमोर येतील…

अरविंद म्हापणकर; भंडारी प्राथमिक शाळेच्या सभागृहात नव्याने तयार करण्यात आलेल्या रंगमंचाचे उद्घाटन… मालवण दि प्रतिनिधीज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत घडलो त्या शाळेमध्ये एका रंगमंचाचे उदघाटन करण्यासाठी मला बोलाविले हे माझे मी भाग्य समजतो. अभ्यासा बरोबरच मुलांच्या कला क्रीडा गुणांना वाव देणारी शाळा म्हणून भंडारी हायस्कुल कडे पाहिले जाते. या रंगमंचावर वावरणारी चिमूरडी मुले उद्याची भावी…

Read More

खासकीलवाडा-चराठे येथील चोरट्याने बंद घर फोडली…

सहा हजारचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.. ⚡सावंतवाडी ता.२६-: खासकीलवाडा चराठे येथील बंद घर अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे यात सुमारे ६ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.याबाबतची तक्रार नायर यांनी दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read More

जिल्हास्तरीय शारसौष्ठव स्पर्धेत कुडाळचा सागर काळप मानकरी…

मालवण येथे स्पर्धा संपन्न; सिंधूरत्न कला- क्रीडा मंडळाचे आयोजन.. मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील सिंधुरत्न कला-क्रीडा मंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने ‘सिंधुरत्न श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एम्पायर जीम, कुडाळच्या सागर काळप याने सिंधुरत्न श्री २०२३ हा मानाचा पुरस्कार पटकावताना त्याला ३० हजार रुपये पारितोषिक, पदक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मालवण येथील…

Read More

नांदगाव वैश्य समाज वधू वर मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

नांदगाव केंद्र शाळा नंबर एक येथे संपन्न ; 400 वधू वर यांची नोंदणी. ⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाजाच्यावतीने वैश्य समाज बांधव वधू वर सूचक मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे .याला महाराष्ट्र भरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथे संपन्न झालेल्या या मेळाव्यात जवळपास 400 वधू वर यांनी…

Read More

कलाकारांना आणि त्यांच्या कलाकृतींना स्थानिकांनी पाठबळ दिले पाहिजे…

अभिजीत वारंग; मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे सत्कार… ⚡मालवण ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या परंपरा, संस्कृती, कला या जगासमोर आणण्याच्या दृष्टीने आपण विविध चित्रपट बनवत आहोत. दशावतार सारख्या आद्य कलेवर आधारित मी बनविलेल्या पिकासो या चित्रपटासाठी आपणास उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र या चित्रपटांना जिल्ह्यातच म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या संस्कृतीवर आधारित चित्रपटांना आपलेच…

Read More

विशाल परब यांच्याकडून कडून शिरोडा येथील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यासाठी ५० हजारांची मदत

भाजप शिरोडा शहर यांचा पाठपुरा : शिरोडा व्यापारी संघटनेकडे धनादेश सपूर्त ⚡वेंगुर्ले ता.२६-: शिरोडा बाजारपेठ येथे अचानक आग लागून व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले. यांना मदत मिळावी म्हणून सर्व बाजारपेठ बंद ठेऊन श्री माऊली सभागृह येथे शिरोडा पंचक्रोशी तील व्यापारी व ग्रामस्थ,व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शिरोडा व्यापारी…

Read More

बांदा देऊळवाडी श्री महापुरुष मीत्रमंडळ वार्षिक पुजा उत्साहात 

⚡बांदा ता.२६-: बांदा देऊळवाडी येथिल धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक येथिल श्री देव महापुरुष देवस्थान येथे आय़ोजित वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. श्री महापुरुष मित्रमंडळातर्फे या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   सकाळी श्री देव महापुरुष तसेच श्री सत्यनारायण पुजा करण्यात आली. पुरोहित प्रमोद वडेर यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

संस्कारक्षम पिढी घडवण्यास गुरुवर्य डी .आर.खवणेकर यांचा सिंहाचा वाटा…

डॉ. सदानंद मालवणकर;डी.आर. यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण … मालवण ता.२६-:स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मालवणच्या भंडारी ए सो हायस्कुलचे तत्कालीन मुख्याध्यापक गुरुवर्य डी. आर. खवणेकर आणि त्यांच्या गुरुजनांच्या टीमने जे ज्ञानदानाचे कार्य केले त्या कार्यामुळेच एक संस्कारीत पिढी निर्माण झाली. संस्कारक्षम पिढी घडविण्यास गुरुवर्य डी. आर. खवणेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याने या ज्ञान मंदिरात वावरणाऱ्या…

Read More

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

⚡कणकवली ता.२६-: वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा नं. १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’ राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२१-२२  जाहीर झाला होता. त्यांना हा पुरस्कार मुंबई, बांद्रा येथील रंग शारदा सभागृह येथे राज्याचे पर्यटन,कौशल्य विकास विभाग,महिला व बालविकास विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा…

Read More
You cannot copy content of this page