कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर भाजप युवा मोर्चाची स्वच्छ्ता

गौरव लुडबे मित्रमंडळाचे आयोजन;
मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला कचरा

मालवण दि प्रतिनिधी :
भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते गौरव लुडबे मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा यावेळी गोळा करण्यात आला.

या मार्गावर सातत्याने अज्ञात नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ बनत होता, दुर्गंधी पसरत होती. मार्गावरून जाणारे नागरिक, विध्यार्थी यांनाही त्रास सहन करावा लागत होता. याप्रश्नी सामाजिक जाणीवेतून गौरव लुडबे मित्रमंडळ यांनी रविवारी याठिकाणी स्वच्छता मोहीम रावबत परिसर स्वच्छ केला.

स्वच्छ केलेल्या परिसरात कोणीही कचरा टाकू नये. असे आवाहन करताना ‘हय जो कचरो टाकटलो त्याचा वाटोळा होताला’ अश्या मालवणी आशयाचा फलकही त्याठिकाणी लावण्यात आला आहे.

यावेळी उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य अनिता गांवकर, विनय गांवकर, विनोद भोगावकर, राजेंद्र लुडबे, गौरेश कांबळी, आरती लुडबे, हार्दिक महाजन, सुरज भानुशाली, मधु चव्हाण, राज झोरे, भिरु झोरे, सुयश चव्हाण, आदित्य डांगे, अमर सूर्यवंशी, अनिकेत जाधव, सचिन सावंत, राजू मराठे, पार्थ यादव, मनोहर सावंत, संदीप झोरे, वैशाली झोरे आदी उपस्थित होते.

फोटो :

गौरव लुडबे मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली

You cannot copy content of this page