दीपक केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेलो याचा मला पश्चाताप..

सुभाष देसाई; केसरकारांची पुढची उडी भाजप; मात्र त्यांचा टिशूपेपर होणार.._

⚡सावंतवाडी ता.२६-: शिवसेनेत काम करत असताना आजपर्यंत अनेकांना मातोश्रीवर घेऊन गेलो मात्र त्यापैकी दीपक केसरकर यांना मातोश्रीवर घेऊन गेलो याचा आपल्याला आज पश्चाताप होत आहे,राणेंच्या दहशतवालाविरुद्ध शेवटपर्यंत लढणार असे सांगणारे केसरकरच आज त्यांच्या मांडीवर जाऊन बसले असे टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज येथे केली.

तर केसरकर यांची पुढची उडी ही भाजपात असणार आहे मात्र भाजपा त्यांचा वापर करून टिशू पेपर प्रमाणे कुठल्या कुठे फेकून देणार हे त्यांनाही समजणार नाही असेही श्री देसाई म्हणाले.
सावंतवाडी येथील आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी समन्वयक प्रदीप बोरकर जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत अतुल रावराणे चंद्रकांत गावडे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मंदार शिरसाठ सागर नाणोसकर, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.

श्री देसाई पुढे म्हणाले, दगा फटक्याने आमचे सरकार घालवले त्यामध्ये आम्ही निवडून दिलेलेच 40 आमदार होते आणि त्यामध्ये दीपक केसरकर होते हे मोठे दुर्दैव, आज त्यांची अवस्था प्रभाकर शोले पिक्चर मधील जलर प्रमाणे झाले आहे, अर्धे इकडे अर्धे तिकडे मागे मात्र कोणीच नाही त्यामुळे सावंतवाडीत सभा घ्यायची त्यांची हिंमत होत नाही शिवसेनेत येताना सिंधुदुर्गातील ज्या दहशतवादाची भाषा करत होते त्याच नारायण राणेंच्या मांडीवर जाऊन बसण्याची पाळी आज त्यांच्यावर आली आहे उद्या राणेंना निवडून द्या असा जोगवा मागण्याची पाळी ही त्यांच्यावर येणार मग यांचा दहशतवाद कुठे जाणार, केसरकर यांची पुढची उडी ही भाजपात असणार मात्र ते शेतकऱ्यांची गरज संपली की भाजपा टिशू पेपर प्रमाणे त्यांना कुठल्या कुठे फेकून देणार हे त्यांनाही समजणार नाही.
ते पुढे म्हणाले, शिवसेना ही रोपट असल्यापासून गेली 57 वर्ष आपण निष्ठेने आणि अभिमानाने काम केले त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आणि आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले यापुढे सुद्धा जीवात जीव असेपर्यंत शिवसेनेचे गेलेले वैभव पुन्हा मिळाल्याशिवाय आपण डोळे मिटणार नाही आपल्याला विश्वास आहे की कडवट शिवसैनिकाच्या जोरावर गेलेल शिवसेनेचे वैभव पुन्हा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या पदासाठी तुम्ही शिवसेनेची विश्वासघात केला ते मागण्याची हिंमत तुमच्यात नव्हती म्हणूनच तुम्ही सुरत आणि गुवाहाटी पळालात आज जरी तुम्ही शिवसेना हे नाव आणि चिन्ह चोरलं असलं तरी आम्ही तीळ मात्र हललो नाही त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईपर्यंत शिवसैनिक गप्प बसणार नाही.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते जान्हवी सावंत बाळा गावडे अतुल राव राणे उपस्थित यांना मार्गदर्शन केले मेळाव्यामध्ये शिवसेनेकांची लक्षणीय गर्दी होती.

You cannot copy content of this page