सावंतवाडी शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख विनायक पांगम यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२६-: शिवसेनेचे सावंतवाडीचे माजी शाखाप्रमुख विनायक पांगम (रा. जुना बाजार) यांचे आज दुपारी गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी असल्याने त्यांच्यावर गोवा बांबोळ येथे उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

शहरातील नाईक मोटर ड्रायव्हिंग स्कूल मधून त्यांनी अनेकांना वाहन देखील शिकवले होते.

You cannot copy content of this page