बांदा देऊळवाडी श्री महापुरुष मीत्रमंडळ वार्षिक पुजा उत्साहात 

⚡बांदा ता.२६-: बांदा देऊळवाडी येथिल धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक येथिल श्री देव महापुरुष देवस्थान येथे आय़ोजित वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. श्री महापुरुष मित्रमंडळातर्फे या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  सकाळी श्री देव महापुरुष तसेच श्री सत्यनारायण पुजा करण्यात आली. पुरोहित प्रमोद वडेर यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान राजन पेडणेकर यांनी सपत्नीक पुजन केले.भाविकांच्या उपस्थितीत दुपारी  महाआरती   होऊन सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.त्यानंतर  महाप्रसादास आरंभ झाला.

 संध्याकाळी भजन तसेच  संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घेतला श्री महापुरुष मीत्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते,महीला सदस्य तसेच येथील व्यापारी बांधवांनी या सोहऴ्याच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

फोटो – (बांदा देऊळवाडी येथे श्री महापुरुष देवस्थान वार्षिक पुजा सोहळ्यात आरती करताना  भाविक  )

You cannot copy content of this page