मालवण येथे स्पर्धा संपन्न; सिंधूरत्न कला- क्रीडा मंडळाचे आयोजन..
मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील सिंधुरत्न कला-क्रीडा मंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने ‘सिंधुरत्न श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एम्पायर जीम, कुडाळच्या सागर काळप याने सिंधुरत्न श्री २०२३ हा मानाचा पुरस्कार पटकावताना त्याला ३० हजार रुपये पारितोषिक, पदक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मालवण येथील सिंधुरत्न कला-क्रीडा मंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने ‘सिंधुरत्न श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा नुकतीच “मामा वरेरकर नाट्यगृह येथे झाली. स्पर्धा ५० ते ५५, ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७०, ७० किलोवरील अशा पाच गटांत खेळविण्यात आली.
या स्पर्धेत मोस्ट इम्प्रूव्हड बॉडीबिल्डर म्हणून बंटी सारंग (फिटनेस वॉरिअर जीम, मालवण) याला सन्मानित करण्यात आले. त्याला ३ हजार रुपये, चषक देण्यात आला. बेस्ट पोझर म्हणून चंदन कुबल (सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ले) याची निवड करण्यात आली. त्याला ३ हजार रुपये तसेच चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
पहिला गट (५० ते ५५ किलो वजनी गट) प्रथम-विपुल करलकर, द्वितीय- राजेंद्र बंडवे, तृतीय- आनंद राऊळ, चौथा- प्रथमेश पारकर, पाचवा–हरिश राज. दुसरा गट ( ५५ ते ६०) प्रथम – सागर काळप, द्वितीय -रामा मानकर, तृतीय-शंकर माने, चौथा—समीर मामलेकर, पाचवा- प्रथमेश मानकर. तृतीय गट (६० ते ६५) प्रथम – गणेश सरवंजे, द्वितीय-प्रीतम शिंदे, तृतीय – ज्ञानेश्वर आळवे, चौथा-भूषण खोत, पाचवा – रोशन चोपडेकर. चौथा गट (६५ ते ७०) प्रथम- गणेश सातार्डेकर, द्वितीय-बंटी सारंग, तृतीय- सहदेव नार्वेकर, चौथा- योगेश मेस्त्री. पाचवा. गट (७०-खुला गट) प्रथम- प्रशांत खोत, द्वितीय- धर्मपाल जाधव, तृतीय-विपुल घोगळे, चौथा – पराग साळकर.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या हस्ते झाले. यावेळी सोनू खंडारे, उद्योजक प्रीतम गावडे, मंदार ओरसकर, प्रवीण हिंदळेकर, अमोल तांडेल, गणेश भट्ट, अमोल सावंत, महेश धामापूरकर, रुपेश सातार्डेकर, मिथुन शिगले, मुन्ना झाड, दुर्गेश गावकर, गीतेश चव्हाण, प्रवीण हिंदळेकर, वैभव खोबरेकर, ओंकार केळुस्कर, राजेश कामतेकर, विकास पांचाळ उपस्थित होते. पंच म्हणून सुनील गावडे (मुंबई), वसंत शेट्टी (कुडाळ), सुधीर हळदणकर (सावंतवाडी) यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.
