Headlines

जिल्ह्यात श्वेत क्रांतीला मिळणार बळ

मनीष दळवी; जिल्हा बँक, जिल्हा परिषदेसह गोकुळ आणि भगीरथमध्ये झाला सामंजस्य करार ओरोस ता.०९-: जिल्ह्याच्या श्वेत क्रांतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या शाश्र्वत विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दूध उत्पादक संघ यांच्या तीन सामंजस्य करार आज करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सावंतवाडी केक कापून उत्साहात साजरा …

⚡सावंतवाडी ता.०९-: मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिर्घायुष्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, सरपंच सेवा तालुका समन्वयक अब्जू सावंत, माजी…

Read More

वेंगुर्ले येथे दि. 14 व 15 फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक 2023 आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत निर्णय ⚡वेंगुर्ले ता.०९-: वेंगुर्ले येथील सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत भंडारी समाजातील तरुण समाज बांधवांना समाजकार्याची गोडी लागण्यासाठी लावण्यासाठी व करिअर घडविण्यासाठी महासंघाने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले असून त्याचे यजमानपद वेंगुर्ले तालुक्याला देण्याचे ठरले.सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गची सभा येथील साईमंगल कार्यालयात भंडारी…

Read More

कॉलेज युवतीची सॅग अज्ञाताने चोरली

कुडाळ :कॉलेजची सॅग प्रॅक्टिकल रूमच्या बाहेर ठेवून गेली असताना विद्यार्थिनीची ही सॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना कुडाळ येथील एका महाविद्यालयात गुरुवारी सकाळी 11:00 च्या सुमारास घडली. सॅग चोरून नेणारी व्यक्ती अनोखी व अज्ञात असून या विद्यार्थिनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अज्ञात युवका विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

१९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत एम क्रिकेट संघ विजेता

कृष्णाई चषक क्रिकेट स्पर्धा;युनियन क्लब जिमखाना बेळगाव उपविजेता बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी जिमखाना मैदानावर ११ वर्षाखालील कृष्णाई चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एम क्रिकेट अकादमी संघाने युनियन क्लब जिमखाना बेळगाव संघावर ४६ धावानी मात करत विजेतेपद मिळविले.स्पर्धेचे उदघाट्न सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी एम क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान, जिल्हा…

Read More

रेहान केरकर १४ वर्षाखालील गोवा संघाचा कर्णधार

सावंतवाडी एम क्रिकेट अकदमीचा खेळाडू बांदा/प्रतिनिधीगोवा राज्याच्या १४ वर्षाखालील रणजी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी सावंतवाडी येथील एम क्रिकेट अकादमीचा खेळाडू रेहान केरकर (रा. कोरगाव-गोवा) याची निवड झाली आहे. रेहान हा अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित आहे.गोवा राज्य संघाची निवड चाचणी पार पडली. यामध्ये रेहानची पहिल्या ४० खेळाडू मध्ये निवड झाली. त्यानंतरच्या मैदानी निवड चाचणी सामन्यात त्याने १००,…

Read More

बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखली…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल ⚡सावंतवाडी ता.०९-: बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोन डंपरवर मध्यरात्री कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी केली आहे. सदर डंपर चालकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

घरासमोरील इलेक्ट्रिक वायरची बंडल चोरीला…

दोघा संशयितांना अटक; बांदा पोलिसांची कारवाई… बांदा/प्रतिनिधीघरासमोर ठेवलेली ६० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायरची दोन बंडले चोरून नेल्याप्रकारणी बांदा पोलिसांनी दोघा परप्रांतीय कामगारांना काल रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी ठेकेदार सुनील राऊळ यांनी ५ फेब्रुवारी रोजी बांदा पोलिसात तक्रार दिली होती.धीरा लक्ष्मण नाईक-चव्हाण (वय ४५) व संतोष फोमा नाईक-चव्हाण (वय ३४, दोघे रा. मेरशी-गोवा) अशी…

Read More

हळवल फाटा येथील अपघात रोखण्यासाठी बाळू मेस्त्री यांचे उदया ठिय्या आंदोलन

⚡कणकवली ता.०९-: मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथील वळणावर सातत्याने अपघात होत आहे.या ठिकाणी अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्त्यांमुळे हे अपघात होत आहेत.या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? याबाबत उप विभागीय अधिकारी यांना पत्र दि. 25 जानेवारी 2023 दिले होते.याबाबत कोणतेही उत्तर किंवा कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे उ अपघात रोखण्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी सामाजिक…

Read More

लेखक प्रवीण बांदेकर यांचा अखंड लोकमंच व कणकवली नगरपंचायतच्यावतीने नागरी सत्कार

⚡कणकवली ता.०९-: सर्वसामान्य माणसे संभ्रमित होऊन जगत असताना एखादा लेखक वास्तव मांडतो आणि त्याला जेव्हा समजाकडून प्रोत्साहन मिळतं ती खरी ऊर्जा असते. समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या मांडण्यासाठी मी लेखन करतो.त्याला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार म्हणजे मुकेपणाने जगणाऱ्या साऱ्या माणसांचा सन्मान आहे. असे उद्गार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी काढले.कणकवली येथे अखंड लोकमंच…

Read More
You cannot copy content of this page