⚡सावंतवाडी ता.१६-: होळी व रंगपंचमी सणाचे औचित्य साधून निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये नैसर्गिक रंगांची उधळण करत रंगपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.
प्रशालेचे संस्थापक डॉ. शेखर जैन सर यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांना रंग लावून होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. विविध रंगांनी प्रशालेचा सर्व परिसर रंगमय झाला होता.
विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमीचा आनंद घेतला. कृत्रिम रंगांचा आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतो पाणी जपून वापरावे व पाण्याचा अपव्यय टाळावा हे लाख मोलाचे संदेश दिले. विविध नैसर्गिक रंग व सोबतीला रंगपंचमीची गाणी यावर सर्व विद्यार्थ्यांचे पाय थिरकत होते. शेवटी सर्व विदयार्थ्यांना गोड खाऊ वाटण्यात आला.
