सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार महेंद्र पटेल यांना जाहीर

⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचा या वर्षीचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार श्रीराम वाचन मंदिरचे ग्रंथपाल तथा सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कृती समितीचे कार्यतत्पर कार्यवाह श्री. महेंद्र पटेल यांना जाहीर करण्यात आला आहे.
ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा संथालय संघाच्यावतीने त्यांची आदर्श ग्रंथालय सेवक या जिल्हास्तरीय पुस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कुडाळ येथे १९ मार्च रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ असे असणार आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

You cannot copy content of this page