सध्या तिन्ही तालुका प्रमुख चांगलेच झोडत आहेत;खा राऊत यांनी केले सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका प्रमुखांचा विशेष उल्लेख
ओरोस ता.१५-:सावंतवाडीचा बगळा पण आता टीका करायला लागला आहे. मात्र, त्याच्या टीकेला उत्तर द्यायला आमचे तिन्ही तालुका प्रमुख पुरे आहेत. ते सध्या त्याला चांगलेच झोडत आहेत, अशा प्रकारची टीका खा विनायक राऊत यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. खा राऊत सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आपल्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
