कुर्ली ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश
⚡कणकवली ता.०८-: वैभववाडी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश कदम तसेच गावातील कार्यकर्ते सुजित सावंत, कृष्णा कदम, गणेश गायकवाड, बाबू कदम आदींनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिनाच्या औचित्यावर नवीन कुर्ली वसाहत येथे त्यांच्या मारूती निवास येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. राष्ट्रवादीचे प्रांतिक…
