केंद्रीयमंत्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० रोजी जिल्हा बँकेच्या विविध सुविधांचा शुभारंभ

मंत्री राणे, गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची असणार उपस्थिती

⚡सिंधुदुर्ग दि.०८ प्रसन्न गोंदावळे-: केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 10 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो एटीएम कार्डचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिजाई महिला सेवा संस्था अध्यक्ष नीलम ताई राणे, गोवा बागायतदार अध्यक्ष तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व सर्व संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page