शिवसेना इन्सुली उपविभाग प्रमुखपदी विजय देसाई यांची नियुक्ती

⚡बांदा ता.०८-: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र तथा ग्रामपंचायत सदस्य विजय शंभा देसाई यांची शिवसेना इन्सुली उपविभाग प्रमुखपदी(शेर्ले पंचायत समिती) नुकतीच निवड झाली आहे. तसे पत्र त्यांना सचिव श्री मोरे महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना दिले आहे.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख अशोकर दळवी, महिला जिल्हा प्रमुख निता सावंत, कविटकर सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई व इतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार व ८० टक्के समाजकारण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील शिवसेना कार्यकर्ते यांच्याशी प्रामाणिक पोहोचवण्यासाठी काम करेन असे नियुक्ती नंतर विजय देसाई यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विजय देसाई हे शिवप्रेमी असून त्यांनी श्री साई समर्थ ट्रक चालक-मालक संघटनेचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे डेगवे पंचक्रोशीतील त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page