निबंध स्पर्धेत श्रुती शेवडे प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रुती श्रीधर शेवडे हिने प्रथम तर साहिल अनिल भाईडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांना वर्धमान महावीरांचे तत्वज्ञान माहिती व्हावे. मानवी जीवनातील मुलभूत तत्वे विद्यार्थ्यांनी अंगिकारून आनंदी समाज निर्माण करावा हाच उद्देश या स्पर्धेमागे होता. शेवडे व भाईडकर यांना प्रा.भिसे, प्रा.वैभव खानोलकर व लिपिक अजित केरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page