कांदळगाव येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीर

⚡मालवण ता.०८-: कांदळगावचे सुपुत्र तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कांदळगाव येथील स्नेहांगण (रामेश्वर मंदिर समोर) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मालवण भाजपचे सरचिटणीस अशोक सावंत, महेश मांजरेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उद्योजक डॉ. दीपक परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिराला विवेकानंद नेत्रालय, कणकवली यांचे सहकार्य लाभणार आहे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष पारकर ( ७४९८३९३०४१), विहार कोदे, संदीप कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page