⚡वेंगुर्ला ता.०८-: जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनसेवा प्रतिष्ठान सिधुदुर्ग, सिधुदुर्ग होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन आणि आरोग्य विभाग, जिल्हापरिषद सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल रोजी पणदूर हायस्कूल येथे सायंकाळी ३ ते ६ यावेळेत ‘सर्वजण स्वास्थ्य‘यावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेत ‘कर्करोग आणि होमिओपॅथिक उपचार‘यावर होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.सुखदेव कुंभार तर ‘होमिओपॅथिक उपचार आणि सर्वसाधारण व्याधी‘ यावर होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.जगदिश तेंडुलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ.सुखदेव कुंभार यांना जनसेवा प्रतिष्ठानतर्फे होमिओपॅथिक जीवन गौरव पुरस्काराने तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठातर्फे घेतलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरच्या आधुनिक औषधप्रणाली म्हणजेच ऍलोपॅथी पदवी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर डॉ.प्रविण सानेकर व डॉ.बाळकृष्ण ठाकूर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यशाळेत जास्तीत जास्त डॉक्टरांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत व सिंधुदुर्ग होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.अरूण गोडकर यांनी केले आहे.
